Rupali chakankar | Gautami Patil
Rupali chakankar | Gautami PatilTeam Lokshahi

गौतमी पाटीलच्या मदतीला धावले राज्य महिला आयोग; चाकणकरांनी दिली महत्त्वाची माहिती

महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे.

नुकताच नृत्यांगना गौतमी पाटील ही सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली. गौतमी तिच्या डान्ससोबतच तिची सुंदरता आणि फॅशनसाठी ओळखली जाते. तिची एक झलक पाहाण्यासाठी तरुण काही करू शकतात. मात्र, त्याच गौतमी पाटीलसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तिचा लपून कपडे बदलतानाचा एक अश्लील व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकरणी सोशल मीडियावर सकाळपासून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अखेर या प्रकरणी राज्य महिला आयोगानेदेखील दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Rupali chakankar | Gautami Patil
गौतमी पाटीलचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, चाहते संतापले

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

रुपाली चाकणकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. त्या म्हणाल्या की, महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

पुढे त्या म्हणाल्या की, लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील. असे देखील मत त्यांनी यावेळी मांडले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com