आता भाजपाकडून फिरवण्यात आली भाकरी; तब्बल 1200 जणांचा कार्यकारिणीत समावेश

आता भाजपाकडून फिरवण्यात आली भाकरी; तब्बल 1200 जणांचा कार्यकारिणीत समावेश

महाराष्ट्राचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्राचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. भुसावळचे माजी नगरसेवक तथा भाजपच्या ओबीसी सेलचे माजी पदाधिकारी अजय एकनाथ भोळे यांना प्रदेश चिटणीसपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत नागपूरातील दोघांना स्थान देण्यात आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र भाजपात मोठे फेरबदल केले आहे. २८८ विधानसभा मतदारसंघासाठी एकूण २८८ संघटकाची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या कार्यकारिणी दर तीन वर्षानंतर फेरबदल केले जातात.

एकूण १२०० जणांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आले आहे. उपाध्यक्ष म्हणून नागपूर शहरातून दोघांना स्थान देण्यात आले आहे. प्रा. संजय भेंडे पूर्वीच्या कार्यकारिणीतसुद्धा उपाध्यक्ष होते. आता त्यात पदोन्नती देऊन धर्मपाल मेश्राम यांना या कार्यकारणीत घेण्यात आले आहे. कोषाध्यक्षपदी मिहिर कोटेचा नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये 16 उपाध्यक्ष, 5 सरचिटणीस, 16 सचिव यांच्यासह इतर महत्वाची पदही जाहीर झाली आहेत.

तसेच मुरलीधर मोहोळ, रणधीर सावरकर, विजय चौधरी, माधवी नाईक, विक्रांत पाटील यांची सरिचटणीसपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर सुरेश हळवणकर, संजय बाळा भेगडे, माजी खासदार अमर साबळे, स्मिता वाघ, जयप्रकाश ठाकूर, राजेंद्र गावित इतर उपाध्यक्षांमध्ये नेमणूक करण्यात आली असून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निमंत्रित सदस्य असून माजी आमदार अनिल सोले, माजी महापौर नंदा जिचकार आणि काटोलचे चरणसिंग ठाकूर यांना सदस्य म्हणून कार्यकारिणीत घेतलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com