अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार वधारला, सेन्सेक्स 60,000 पार

अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार वधारला, सेन्सेक्स 60,000 पार

अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमवीर शेअर बाजारात सकारात्मक संकेत मिळत आहेत.

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमवीर शेअर बाजारात सकारात्मक संकेत मिळत आहेत. सकाळीच सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह उघडले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकमध्ये 550 अंकानी वाढ झाली. तर, निफ्टीतही 82 अंकानी वधारला आहे.

अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार वधारला, सेन्सेक्स 60,000 पार
बुडीत कंपन्यांचे मालक ढेकर देत आहेत सरकार मात्र...; शिवसेनेचा निशाणा

सेन्सेक्‍समध्ये आज 550 अंकांनी वाढ होऊन तो 60,001अंकावर सुरु झाला. तर निफ्टीमध्ये 82 अंकांनी वाढ होऊन तो 17,731 वर पोहोचला. शेअर बाजार बंद होताना मेटल आणि कॅपिटल गुड्‌सच्या शेअर्समध्ये आज मोठी खरेदी झाल्याचे दिसून आले. मेटल इंडेक्‍समध्ये आज 2.4 टक्के, तर कॅपिटल गुड्‌स इंडेक्‍समध्ये 1.4 टक्‍क्‍यांची वाढ झाली. आज पायाभूत सुविधा, भांडवली वस्तू आणि संरक्षण, एफएमसीजी, पायाभूत सुविधा, उत्पादन, एमएसएमई, रेल्वे आणि बँकिंग क्षेत्रातील शेअरमध्ये तेजी आहे.

अर्थसंकल्प 2023 मधील घोषणा नजीकच्या भविष्यात शेअर बाजाराची दिशा ठरवतील. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या नजरा आज सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाकडे असतील. काल म्हणजेच मंगळवारी शेअर बाजार तेजीसह बंद झाला होता. जानेवारीत आतापर्यंत भारतीय बेंचमार्कनुसार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 3 टक्क्यांच्या जवळपास घसरले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com