संजय शिरसाट यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक, मोठी खळबळ

छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांच्या कारवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आहे.
Published by :
shweta walge

छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांच्या कारवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आहे.

एक मोठी बातमी समोर आली आहे. आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आहे. शिरसाट कुटुंबीय सोबत असतांना हा प्रकार झाल्याच समोर आलं आहे.

संभाजीनगरच्या बाबा पेट्रोल पंपाजवळील महावीर चौकात रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

रस्त्यावर भांडण सुरू असल्याने शिरसाट कुटुंबीयांनी गाडी थांबवली होती. शिरसाट यांच्या पत्नी, कन्या आणि मुलगा गाडीत होत्या. दगड फेकीच्या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com