ताज्या बातम्या
नाशिकमध्ये रात्रीच्यावेळी जमावाकडून दगडफेक; पोलीस जखमी, वाहनांचे नुकसान
नाशिकच्या काठे गल्ली परिसरात असलेलं वादग्रस्त धार्मिकस्थळ अखेर हटवण्यात आलं आहे.
नाशिकच्या काठे गल्ली परिसरात असलेलं वादग्रस्त धार्मिकस्थळ अखेर हटवण्यात आलं आहे. 15 दिवसांची मुदत संपल्यानंतर नाशिक महापालिकेनं आज सकाळी ही कारवाईला सुरूवात केली होती, त्यानंतर ही कारवाई पूर्ण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र काल रात्री या परिसरात काही अज्ञात समाज कंटकांनी दगडफेक केली. 400 हून अधिक जणांच्या जमावाने रात्री उशिरा रस्त्यावर उतरून दगडफेक केली. याप्रकरणी आता काही लोकांना ताब्यात घेण्यात आले असून 57 संशयितांच्या मोटरसायकली ताब्यात घेतल्या आहेत.
या घटनेत 31 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. आज सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात हे धार्मिक स्थळ हटवण्यात आलं आहे.