Sonu Nigam : सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान दगडफेक; कार्यक्रम अर्धवट थांबवला

Sonu Nigam : सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान दगडफेक; कार्यक्रम अर्धवट थांबवला

लोकप्रिय गायक सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान गोंधळ झाल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लोकप्रिय गायक सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान गोंधळ झाल्याची घटना घडली आहे. दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीतील ‘इंजीफेस्ट 2025’ या कार्यक्रमाला सोनू निगमने हजेरी लावली. सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते.

या सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. सोनू निगम गात असताना स्टेजवर अचानक दगड आणि बाटल्या फेकण्यात आल्या. दगडफेक होत असल्याचं पाहून सोनूने प्रेक्षकांना शांत होण्याचं आवाहन केलं.

मात्र तरीही विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरुच होता. यामुळे सोनू निगमला अर्धवट कार्यक्रम थांबवावा लागला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com