ताज्या बातम्या
मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक
सोलापूर जिल्ह्यातील जेऊर जवळ घडली घटना
थोडक्यात
मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक
सोलापूर जिल्ह्यातील जेऊर जवळ घडली घटना
दगडफेकीत वंदे भारत एक्स्प्रेसची काच फुटली
वसीम अत्तर, सोलापूर
मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील जेऊर जवळ ही घटना घडली आहे.
दगडफेकीत वंदे भारत एक्सप्रेस सी -11डब्यातील काच फुटली असून सुदैवानं कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
मात्र दगडफेक कोणत्या कारणाने करण्यात आली हे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.