JNU
JNU Team Lokshahi

जेएनयूमध्ये बीबीसीच्या मोदींविरोधातील डॉक्युमेंटरीचे प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दगडफेक

"India: The Modi Question" BBC ने बनवलेल्या नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी डॉक्युमेंट्री दाखवणाऱ्यांवर जेएनयूमध्ये आज दगडफेक झाली.

2002 मध्ये देशात गुजरात येथे मोठी दंगल घडली. परंतु, ही दंगल घडली तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे होते. त्यातच BBC ने देखील नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी "India: The Modi Question" ही दोन भागांची मालिका प्रसारित केली आहे. परंतु, प्रचंड गोंधळानंतर ह्या डॉक्युमेंट्रीला भारतात बॅन करण्यात आले होते. मात्र, आज जवाहरलाल नेहरू विद्यापीठात JNU मध्ये आज काही विद्यार्थ्यांनी ह्या डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग आयोजित केले होते. मात्र, याचवेळी त्या विद्यार्थ्यांवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.

"India: The Modi Question" BBC ने बनवलेल्या नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी डॉक्युमेंट्री दाखवणाऱ्यांवर जेएनयूमध्ये आज दगडफेक झाली. रात्री 8.30 वाजल्यापासून कॅम्पसमध्ये वीज नव्हती. जेएनयू स्टुडंट्स युनियनने रात्री ९ वाजता डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग आयोजित करायचे होते. याची स्क्रीनिंग करू नका, असे प्रशासनाने विद्यार्थ्यांना सांगितले होते. जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी निषेधाचे चिन्ह म्हणून स्टुडंट्स युनियन कार्यालयाजवळ वैयक्तिक उपकरणांवर डॉक्युमेंटरी स्ट्रीम करण्यास सुरुवात केली. वसतिगृहांमध्ये इंटरनेट कनेक्शन नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी स्पीकर्सची व्यवस्था केली आणि लॅपटॉपवर स्क्रीनिंग सुरू केली. मात्र, त्याच वेळी त्यांच्यावर दगडफेक झाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com