Mumbai-Pune Expressway Acident
Mumbai-Pune Expressway Acident Team Lokshahi

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर सहा वाहनांचा विचित्र अपघात

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील अपघाताची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आठवडाभरापूर्वी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला होता.

भारत गोरेगावकर : रायगड | मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील अपघाताची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आठवडाभरापूर्वी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच आज पहाटेच्या सुमारास पुन्हा एक्सप्रेस वेवर सहा वाहनांना विचित्र अपघात झाला आहे.

Mumbai-Pune Expressway Acident
कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

भरधाव वेगात जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकने खोपोलीजवळ तब्बल 6 वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये वाहनांचा चक्काचूर झाला. प्राथामिक माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com