ताज्या बातम्या
कोलकात्याच्या घटनेच्या निषेधार्थ जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन
मुंबईतील जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांकडून कामबंद आंदोलन करण्यात येत आहे.
मुंबईतील जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांकडून कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. कोलकात्याच्या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांकडून संपाची हाक देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
9 ऑगस्ट रोजी कोलकातामध्ये महिला निवासी डॉक्टरवर घडलेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर संपूर्ण देशभरामध्ये निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर कोलकात्याच्या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांकडून संपाची हाक देण्यात आली असून जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांकडून कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. डॉक्टरांच्या या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.