राज्यातील विद्यापीठांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप
Admin

राज्यातील विद्यापीठांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप

राज्यातील विद्यापीठांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप आहे.

राज्यातील विद्यापीठांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप आहे. आश्वासित प्रगती योजना, 58 महिन्याची थकबाकी, 1410 कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं आंदोलन करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून या प्रलंबीत मागण्यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे. मात्र तरीही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आज अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारला आहे. बारावी प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असताना त्यासोबतच लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी अनकेदा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले.

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी अनकेदा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. याबाबत अनेकदा बैठका झाल्या. प्रत्येकवेळी मागण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन देखील देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मागण्या मान्य होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com