Exam
Exam Team Lokshahi

ऐकावं ते नवलंच! B.A. च्या विद्यार्थ्याला परिक्षेत मिळाले 100 पैकी 151 मार्क

विद्यापीठातून बीए करत असलेल्या विद्यार्थ्याला एका परीक्षेत 100 पैकी 151 गुण मिळाले.
Published by :
Team Lokshahi
Published on

दरभंगा : बिहारमधून अनेकदा शिक्षणाशी संबंधित विचित्र प्रकरणं समोर येत असतात. त्यातच आता असं एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामुळे तुमचं डोकं चक्रावल्याशिवाय राहणार नाही. जर एखाद्या परीक्षेनंतर 100 पैकी 100 गुण मिळाले, तर त्या विद्यार्थ्याचा, उमेदवाराचा आनंद गगणात मावत नाही. मात्र जर एखाद्याला 100 पैकी 151 गुण मिळाले तर तो नक्कीच बुचकळ्यात पडेल. दरभंगा येथील राज्य सरकारच्या ललित नारायण मिथिला विद्यापीठातील बीएच्या विद्यार्थ्यासोबत हा प्रकार घडला आहे. विद्यार्थ्याला एका परीक्षेत 100 पैकी 151 गुण मिळाले. हे पाहून आनंदी व्हायचं की तक्रार घेऊन विद्यापीठात जायचं हे या विद्यार्थ्याला समजेना झालंय.

ललित नारायण मिथिला विद्यापीठातून बीए (ऑनर्स) करत असलेल्या एका विद्यार्थ्यानं सांगितलं की, जेव्हा त्यानं मार्कशीटवर त्याचा निकाल पाहिला तेव्हा त्याला धक्काच बसला. राज्यशास्त्राच्या पेपरमध्ये त्याला 100 पैकी 151 गुण देण्यात आले होते. विद्यार्थी मार्कशीट घेऊन विद्यापीठात पोहोचल्यावर विद्यापीठाने आपली चूक मान्य करून त्याला दुसरी मार्कशीट तयार करून दिली. तसंच टायपिंगच्या चुकीमुळे ही चूक झाल्याचं सांगण्यात आलं.

Exam
भीषण आर्थिक संकट, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची अमेरिकेकडे मदतीची विनवणी

त्याचवेळी बीकॉमच्या एका विद्यार्थ्यासोबत असाच काहीसा प्रकार घडला. त्याला परीक्षेत शून्य गुण मिळाले, तरीही बढती मिळाली. विद्यापीठाचे कुलसचिव मुश्ताक अहमद यांनी सांगितलं की, दोन्ही प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांच्या मार्कशीटमध्ये टायपिंगमधील त्रुटीमुळे चुका झाल्या आहेत. या चुका सुधारल्यानंतर दोन्ही विद्यार्थ्यांना नवीन गुणपत्रिका देण्यात आल्या आहेत. मुश्ताक अहमद पुढे म्हणाले की, ही फक्त टायपिंग एरर आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com