ताज्या बातम्या
Talathi Exam: उद्याची तलाठी परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी
जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षण आंदोलनावर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या सोमवार, दि. ४ सप्टेंबर २०२३ रोजी बंद पुकारण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षण आंदोलनावर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या सोमवार, दि. ४ सप्टेंबर २०२३ रोजी बंद पुकारण्यात आला आहे. नेमक्या याच दिवशी राज्यभरात तलाठी भरती परीक्षा नियोजित आहे. हजारो विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र मिळाले आहे. उद्याच्या बंदमुळे एसटी सेवा व इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रभावित होण्याची शक्यता असून, तलाठी भरती परीक्षेच्या उमेदवारांची गैरसोय होणार आहे.
या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने उद्याची परीक्षा तातडीने पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून समोर येते आहे. याबाबत शासनाकडून तातडीने कार्यवाही अपेक्षित आहे.