विद्यार्थ्यांनी बनविले दिपावलीसाठी ‘सौरउर्जेवरील मातीचे दिवे, रांगोळी व तोरण’
Team Lokshahi

विद्यार्थ्यांनी बनविले दिपावलीसाठी ‘सौरउर्जेवरील मातीचे दिवे, रांगोळी व तोरण’

नैसर्गिक स्त्रोत्राचा वापर करुन दिवाळी साजरी करण्याचे विद्यार्थ्यांचे अवाहन
Published by :
shweta walge

सतेज औंधकर, कोल्हापूर : वर्षातील मोठा सण म्हणून दिवाळी हा सण सर्वत्र आनंदाने साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे दिव्यांची आरस, विद्युत रोषणाई, त्याचबरोबर घराची शोभा वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या कलाकृतीचे मातीचे दिवे, आकाशदीवे, तोरण लावले जातात. प्रत्येकाचे घर उजळते ते दिव्यामुळे व दिवाळी सणाचा अकर्षण म्हणजे अंगणात पणती लावून सुबक रांगोळी काढून सजावट व दाराचे तोरण. सध्या रंगीत रांगोळी हया पारंपारिकरित्या अंगणात काढल्या जातात व तोरण हे प्लॅस्टीकचे व चीनी कंपनीची बाजारात आली आहेत. या सर्वांवर उपाय म्हणून डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक व नैसर्गिक स्त्रोताचा वापर करीत सौरउर्जेवर चालणारे तोरण, रांगोळी व मातीचे दिवे तयार केले आहेत.

डीकेटीईमध्ये बनविलेले रांगोळी, दाराचे तोरण व मातीचे दिवे हे नैसर्गिक स्त्रोत्रावर म्हणजे सौरउर्जेवरील असल्यामुळे रांगोळीचा ट्रे, तोरण व मातीचे दिवे हे ८ तास सौर उर्जेमध्ये चार्जिंग केल्यास २ ते ३ दिवस स्वंयचलित प्रज्वलीत होतात यामुळे सर्वसामन्यांची विजेची बचत होणार आहे. सर्व साहित्य हे पूर्णपणे पारंपरिक असून स्वदेशी बनावटीच्या साहित्यापासून बनविलेले असून सर्व सामन्यांना परवडेल अशा कमी किमतीत व दिसायला सुबक बनविलेले आहेत. तसेच याचा प्रकाश जास्त पडत असल्यामुळे दिवाळी सणाचा आनंद द्विगणीत होणार आहे. मागील वर्षीच्या दिवाळीसाठी देखील विद्यार्थ्यांनी सौरउर्जेवरील आकाशकंदील तयार केल्या होत्या ते अकाशकंदील आजही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

सौरउर्जेवरील अनोखी रांगोळी ही मोठमोठया कंपन्यामध्ये, मॉलमध्ये, लग्नसमारंभाच्या हॉलमध्ये जिथे वर्षभर रांगोळी हवी असते अशा ठिकाणी सौरउर्जेवरील ही अप्रतीम रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. यामुळे भारतीय संस्कृती जपण्याचे भाग्य देखील मिळेल तर अशी ही सौरउर्जेवरील रांगोळी सर्व महिलांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.

साबीर सनदे, प्रथमेश सरबाळी, अभिषेक माहिते, प्रणव चौगुले, वरद गोरे, प्राजक्ता भोसले, अर्पिता चौगुले, ऐश्‍वर्या गौराजे, पियुष आळतेकर, पृथ्वीराज चव्हाण, हर्ष कोळी, अभिनंदन पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे,आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे संचालक डॉ राहुल आवाडे, खजिनदार प्रकाश दत्तवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी विद्यार्थ्यांस शुभेच्छा दिल्या. सौरउर्जेवरील सर्व साहीत्य तयार करण्यासाठी प्र.संचालिक प्रा. डॉ सौ. एल.एस.आडमुठे, उपसंचालक प्रा डॉ यु.जे. पाटील, प्रा.डॉ आर.एन.पाटील, प्रा.व्ही.डी. शिंदे व प्राध्यपकांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांनी बनविले दिपावलीसाठी ‘सौरउर्जेवरील मातीचे दिवे, रांगोळी व तोरण’
पुण्यात एका हॉटेलला भीषण आग; 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com