कॉपी करण्याचा विचारही करु नका, नाहीतर...; कॉपी करणाऱ्यांना शिक्षण मंडळाचा दणका

कॉपी करण्याचा विचारही करु नका, नाहीतर...; कॉपी करणाऱ्यांना शिक्षण मंडळाचा दणका

दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. त्यामुळे आता शिक्षण मंडळही तयारीला लागले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. त्यामुळे आता शिक्षण मंडळही तयारीला लागले आहे. कॉपी करण्याला आळा घालण्यासाठी आता शिक्षण मंडळाने कडक पाऊल उचलले आहे. परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देता येणार नसल्याचे मंडळाने सांगितले आहे.

सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता अशी पेपरची वेळ आहे. आतापर्यंत अपवादात्मक परिस्थितीत 10 मिनिटे उशीर झाला असला तरी, विद्यार्थ्यांना पेपरला परवानगी देण्यात येत होती. मात्र आता राज्य मंडळाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश केंद्रांना दिले आहेत.

यासोबतत अजून एक दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्या असा शिक्षण मंडळाचा आग्रह आहे. परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता फौजदारी कारवाई होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने असा इशारा दिला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com