ताज्या बातम्या
नाशिक पुणे महामार्गावर तरुणाकडून चालत्या कारच्या टपावर बसून स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केली कारवाई
थोडक्यात
नाशिकमध्ये रिल्स बनवण्यासाठी चालत्या कारच्या टपावर बसून तरुणाची स्टंटबाजी
तरुणाच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केली कारवाई
नाशिकमध्ये रिल्स बनवण्यासाठी चालत्या कारवर बसून तरुणाचा स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नाशिक पुणे महामार्गावर मद्यपी तरुणाकडून चालत्या कारच्या टपावर बसून स्टंटबाजी करण्यात आली.
तरुणाच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ मित्रांकडून रेकॉर्ड करण्यात आला असून तरुणाचा हा स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
तरुणाच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.