Admin
बातम्या
Maharashtra Budget 2023 : आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ
शिंदे-फडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प मांडला जात आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प मांडला जात आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अमृतमहोत्सवी वर्षात देवेंद्र फडणवीस प्रथमच बजेट मांडणार मांडणार आहे. इतकेच नव्हेतर राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपॅडच्या माध्यमातून अर्थसंकल्प वाचला जात आहे. आज तुकाराम बीज असल्याने भागवत धर्मातील तुकाराम महाराजांच्या चरणी दंडवत घालून अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात फडणवीसांनी केली आहे.
अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. यात अंगणवाडी सेविकांचे मानधन 8 हजार 325 रुपयांवरून 10 हजार रुपये तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरून 7200 रुपये तर अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरून 5525 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.