हृदय विकाराच्या झटक्याने बंद पडलेले हृदय, सीपीआर प्रथमोपचार पद्धतीने सुरू करण्यात यश
सांगली : संजय देसाई | हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर रुग्णाला तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्याचा नातेवाईकांचा प्रयत्न असतो पण तरीही रुग्ण दगावल्याचे अनेक उदाहरणे समोर आहेत हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर बंद पडलेलं हृदय पुन्हा सुरू करण्यासाठी सी पी आर या प्रथम उपचार पद्धतीचा उपयोग केला जात नसल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते जर वेळेत सीपीआर दिल्यानंतर रुग्णाला जीवदान मिळते याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे मिरजेतील सुप्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ रियाज मुजावर यांनी हे करून दाखवले आहे.
संजय जुजारे वय 44 राहणार म्हैसाळ याचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने बंद पडलेल्या हृदय सीपीआर उपचार पद्धतीने पुन्हा सुरू करून डॉ रियाज मुजावर यांनी जीवदान दिल्याची घटना समोर आली आहे सकाळी छाती आणि हात दुखत असल्याने त्यांना डॉक्टर रियाज मुजावर यांच्या आयर्न हार्ट केअर क्लिनिक मध्ये हृदय तपासणीसाठी नातेवाईकांनी आणले होते पण तपासणी सुरू असतानाच संजय जिजारे यांना तीव्र हदयविकराचा झटका आला यावेळी डॉ रियाज मुजावर यांनी तात्काळ संजय जुंजारे यांना खाली जमिनीवर झोपवून हाताने छातीवर विशिष्ठ पद्धतीने दाब देऊन सीपीआर प्रथमोपचार दिला पुढील उपचारासाठी एका वाहनातून सिनर्जी हॉस्पीटल मध्ये त्यांना दाखल करण्यात आले उपचार सुरू होण्यापूर्वी जो कालावधी होता यामध्ये सीपीआर देणे सुरूच ठेवल्याने याचा लाभ रुग्णाला पुरे पूर झाला. बंद पडलेले हृदय मेंदु आणि किडनी याचा रक्त पुरवठा सुरू राहिल्याने हृदयाची ठोके पुर्वरत झाले याची लक्षणे दिसल्यानंतर डॉ मुजावर यांनी तात्काळ संजय जीजारे यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे. सीपीआर ही पद्धत जर एखाद्या हृदयविकाराच्या झटका आलेल्या रुग्णावर उपयोगात आणली तर रुग्णाला जीवदान मिळाल्याशिवाय राहत नाही आज या सीपीआर उपचार पद्धतीचा सर्वांनी उपयोग करावा आणि हृदयविकाराच्या रुग्णाला वाचविण्यात जनजागृती करावी असे आवाहन डॉ रियाज मुजावर यांनी केले आहे.