Himanshu Lohia : पुस्तक विक्रेत्यापासून कोट्यवधींच्या जाहिरात कंपनीचा मालक; हिमांशू लोहियाचा थक्क करणारा प्रवास
दिल्लीतील सामान्य कुटुंबात जन्मलेल्या हिमांशू लोहिया यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. एका सामान्य DESU (Delhi Electric Supply Undertaking) लाइनमनचा मुलगा, सरकारी क्वार्टरमध्ये राहणारा, शाळेचे शिक्षण हिंदी माध्यमातून पूर्ण करणारा हिमांशू आज Ardent Adworld Pvt. Ltd. नावाच्या कोट्यवधींच्या टर्नओव्हर असलेल्या BTL जाहिरात कंपनीचा संस्थापक व संचालक आहे.
हिमांशूने शहीद बसंत कुमार विश्वास सर्वोदय विद्यालयातून शिक्षण घेतलं. बारावीनंतर त्यांनी आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये डिजिटल इंजिनिअरिंग व मायक्रो प्रोसेसर सिस्टीम डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. मात्र, आईला कॅन्सर झाल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले. यानंतर त्यांनी व्होडाफोनमध्ये सिम कार्ड विक्रेत्याची नोकरी केली. पुढे एका मार्केटिंग कंपनीत पुस्तक विक्रेता म्हणून काम करत असताना ते दररोज बाईकवर 40 किलो पुस्तक घेऊन दिल्ली-एनसीआर भागात विक्री करत असत.
सुमारे दीड वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी शिक्षण पुन्हा सुरू करत MBICEM (GGSIPU अंतर्गत) येथून पत्रकारितेची पदवी घेतली. मात्र हिंदी पत्रकारितेतील मर्यादित उत्पन्न पाहून त्यांनी जाहिरात क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या काकांनी सुरू केलेल्या जाहिरात कंपनीत त्याने कामाला सुरुवात केली, जिथे त्यांनी Pearls Group व Ferrero Rocher सारख्या ब्रँडसाठी ATL जाहिराती केल्या. 2010 मध्ये Fourth Dimension या दक्षिण भारतातील जाहिरात संस्थेत त्यांनी BTL जाहिरात क्षेत्रातील अनुभव घेतला.
2012 साली त्यांनी मानेसरमधील एका BTL जाहिरात कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून 32000 पगारावर काम सुरू केलं. पुढील आठ वर्षांत त्यांनी HUL, P&G, Marico, Loreal, Philips सारख्या नामवंत ब्रँडसाठी काम करत सुमारे 100 कोटींचा व्यवसाय कंपनीसाठी मिळवून दिला. मात्र, कोविड काळात पगार कपात झाल्यानंतर त्यांनी स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला.
सप्टेंबर 2020 मध्ये त्यांनी Ardent Adworld Pvt. Ltd. ची स्थापना केली. सुरुवातीला घरी बसून काही फ्रीलान्सर्ससोबत काम सुरू केले. LinkedIn व जुने व्यावसायिक संबंध वापरून त्यांना सुरुवातीची कामं मिळाली. Weikfield व Ferrero India सारख्या ब्रँडने सुरुवातीला त्यांच्यावर विश्वास टाकत प्रकल्प दिले. केवळ तीन महिन्यांत त्यांनी 70 लाखांचा व्यवसाय केला.
सध्या कंपनीकडे मानेसरमध्ये दोन युनिट्स आहेत जिथे लाकूड, कार्डबोर्ड, मेटल यांसारख्या साहित्याचा वापर करून POP (Point of Purchase) डिस्प्ले व मार्केटिंग साहित्य तयार केलं जातं. आज या कंपनीत 40 कर्मचारी कार्यरत आहेत व वार्षिक उलाढाल 9 कोटींवर पोहोचली आहे.
हिमांशू यांच्या यशामध्ये त्यांच्या पत्नी सुप्रिया यांचा मोठा वाटा आहे. त्या कोळसा व्यापार क्षेत्रातील एका कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करत होत्या, ज्यामुळे घरचं आर्थिक स्थैर्य राखलं गेलं. त्यांचा आठ वर्षांचा मुलगा जासिथ यालाही नवीन ठिकाणी फिरायला आवडते.
हिमांशू लोहिया यांची कहाणी ही प्रेरणादायक आहे – एका हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्याने, ज्या हातात एकेकाळी पुस्तकांचे ओझं होतं, त्या हातांनी आज कोट्यवधींच्या जाहिरात मोहिमा उभारल्या आहेत.