सोशल मीडियाच्या मेसेज ऐवजी रोज किमान एक तास तरी पुस्तक वाचन करा- सुधा मूर्ती
संजय देसाई|सांगली: लोकांनी मोबाईल आणि व्हाट्सअप वर येणारे मेसेज थोडे बाजूला ठेवून दररोज किमान एक तास तरी वाचन केल पाहिजे. माणसाच्या ज्ञानात भर पडायची असेल तर नवनवीन गोष्टी वाचत आणि लिहीत राहण हे आजच्या घडीला महत्त्वाचा आहे. अस मत इन्फोसिसच्या माजी अध्यक्ष सुधा मूर्ती यांनी व्यक्त केले. सांगली येथे वाचक मेळाव्यात बोलताना त्यांनी आपल मत व्यक्त केले.
जीवनात अभ्यास, खेळ, मैत्री बरोबर वाचत आणि लिहीत राहण हे आजच्या घडीला महत्त्वाच आहे. अस सांगून सुधा मूर्ती म्हणाल्या, मी जन्माने कानडी असलेतरी मनाने मी मराठीच आहे. पहिली पन्नास वर्षे कानडी भाषेत लिखाण केल. पण त्यानंतर मात्र सातत्याने इंग्रजी भाषेत लिखाण करता आल. पण त्याच भाषांतर मात्र अन्य भाषांमध्ये झाल्यामुळे गुजराती, मराठी, तेलुगु तामिळ यासह अनेक भाषातील वाचकांपर्यंत पोहोचता आले. आजवर एकूण 232 पुस्तक लिहिली. पण त्याच्या आवृत्ती अनेक भाषांतून निघाल्या. तेव्हा नव्या पिढीने सतत मोबाईल आणि व्हाट्सअपच्या मागे न लागता आलेले अनुभव लिहीत राहिले पाहिजे. नव्या पिढीने परिस्थितीशी जुळवून घेत येईल ते कष्ट करण्याची तयारी केली पाहिजे अस मत व्यक्त केल. सुधा मूर्ती यांच भाषण ऐकायला भावे नाट्य मंदिर सभागृहात मोठी गर्दी झाली होती.