Sudha Murty
Sudha Murty

इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती, PM मोदींनी ट्वीटरवर केलं अभिनंदन

सुधा मूर्तींना पंतप्रधान मोदींनी पुढील संसदीय कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
Published by :
Team Lokshahi

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड करण्यात आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. राष्ट्रपती कोट्यातून सुधा मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आलीय. समाजसेविका आणि लेखिका म्हणून ख्याती असलेल्या सुधा मूर्तींना मोदींनी पुढील संसदीय कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

मोदी ट्वीट करत म्हणाले, भारताच्या राष्ट्रपतींकडून सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आलीय. मला याचा अत्यंत आनंद आहे. सुधा मूर्ती यांचं सामाजिक क्षेत्रात, परोपकार आणि शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान आहे. त्यांचं कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या माध्यमातून नारीशक्तीचा एक जबरदस्त पुरावा मिळाला आहे. महिलांच्या सामर्थ्याचे आणि क्षमतेचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मी त्यांना संसदीय कार्यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com