Sanjay Raut VS Sudhir Mungantiwar : मंत्रीमंडळात फेरबदल? राऊतांच्या वक्तव्यावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर, "कोणताही बदल होणार..."

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिकिया दिली आहे.
Published by :
Prachi Nate

मंत्रिमंडळात सध्या गोंधळाच वातावरण असल्याचं शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. राज्यातील 4 मंत्री जाणार असल्याचं महत्त्वाच वक्तव्य संजय राऊतांनी केलं. मंत्रिमंडळात कोणाला घ्यायच याच रिमोट देखील दिल्लीत अमित शाहांकडे आहे. असं संजय राऊत म्हणाले होते. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिकिया दिली आहे.

यादरम्यान सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "मंत्रीमंडळासंदर्भात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो केंद्रीय स्तरावर घेतला जातो, राज्यस्तरावर याबाबत कुठलाही निर्णय होत नाही. यासंदर्भात कोणतीही माहिती आधी प्राप्त होत नाही. असा कोणताही बदल होणार असेल तर तो ज्या क्षणी होणार असतो त्याच क्षणी आपल्यापर्यंत पोहचत असतो. पण मला राजकीय वैयक्तिकरित्या असं काही होईल, असं वाटत नाही."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com