Sudhir Mungantiwar : 'दिल्ली विधानसभा निकालाचा परिणाम बिहारच्या निवडणुकीवर होईल'

Sudhir Mungantiwar : 'दिल्ली विधानसभा निकालाचा परिणाम बिहारच्या निवडणुकीवर होईल'

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. दिल्ली विधानसभेसाठी 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दिल्लीतल्या 70 विधानसभा क्षेत्रांमध्ये 13,766 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं असून आज 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजप आघाडीवर दिसत असून भाजपाने दिल्लीत जोरदार मुसंडी मारली आहे. कलांनुसार भाजपला बहुमत मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेसला एका जागेवर आघाडी मिळाली आहे. दिल्लीत काँग्रेस पुन्हा एकदा पराभवाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. आपचे अनेक दिग्गज पिछाडीवर दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ज्या पद्धतीने केजरीवालांनी दिल्लीमध्ये सरकार चालवण्याचा प्रयत्न केला. तो निश्चितपणे दिल्लीच्या विकासामध्ये एक बाधा ठरणारा होता. सर्व फुकट देऊन राज्य चालवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तो प्रयत्न आम्हाला विकास आणि प्रगतीमध्ये निश्चितच आडकाठी टाकणारा आहे.

आता डबल इंजिनचे सरकार दिल्लीत आल्यानंतर मला विश्वास आहे आमच्या देशाची ही राजधानी वेगाने प्रगतीपथावर जाईल आणि केजरीवालांचे असत्य कथन करत सरकार आणण्याचा प्रयत्न जो त्यांनी यशस्वी केला त्याला जनतेने आता योग्य मतदानातून उत्तर दिलं. जैसा कर्म करेगा, वैसा फल देगा मतदार. त्यांनी ज्या पद्धतीचे कर्म केलं तसं मतदार फळ देतो आहे. यासोबतच ते पुढे म्हणाले की, ज्यांनी दारुचा हात पकडला त्यांनी दारुमध्ये जे स्कॅम केलं ना ते स्कॅम हे निश्चितपणे लोकांना आवडत नाही. असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com