Admin
बातम्या
ऊस तोड कामगारांचा ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळला, ३ महिलांसह २ मुलांचा मृत्यू
पंढरपुरात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
पंढरपुरात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ऊस तोड कामगारांचा ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळला असून ३ महिलांसह २ मुलांचा मृत्यू झाला आहे.
अपघातग्रस्त मजूर हे मंगळवारी रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरने ऊसाच्या फडात जात होते. यावेळी ट्रॅक्टर करकंब परिसरात आले असता, चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं. आणि ट्रॅक्टर थेट उजनी कालव्यात कोसळला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या मजुरांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.