ऊसाच्या ट्रॅक्टरने डिझेल टँकरला धडक दिल्याने आग; 7 गाड्या जळून खाक
Admin

ऊसाच्या ट्रॅक्टरने डिझेल टँकरला धडक दिल्याने आग; 7 गाड्या जळून खाक

ऊसाच्या ट्रॅक्टरने डिझेल टँकरला धडक दिल्याने आग लागल्याची घटना घडली आहे.

ऊसाच्या ट्रॅक्टरने डिझेल टँकरला धडक दिल्याने आग लागल्याची घटना घडली आहे. या धडकेनंतर स्फोट होऊन मोठी आग भडकली होती. ही आग रस्त्यावरील इतर वाहनांमध्येही पसरली. 7 वाहनं या भीषण अपघातामध्ये जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बाजूलाच असलेल्या मांजरा नदीपात्रातून पाण्याची सोय करण्यात आल्यामुळे आगीवर नियंत्रण करण्यात यश आलं.

या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील पाच पोलीस पथकं घटनास्थळी तात्काळ दाखल झाली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन लातूर-उदगीर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. लातूर शहरातून उदगीरकडे जाणाऱ्या वाहनाचा मार्ग बदलण्यात आला आहे. गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती हाताळली. तीन अग्निशमन दलाच्या गाड्या, पाच रुग्णवाहिका आणि मोठ्या प्रमाणात हजर असलेल्या पोलिसांनी पुढील हानी टाळण्यासाठी प्रयत्न केले.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 च्या विस्तारीकरणाचं काम सुरु आहे. यामुळे वळण रस्त्यावरुन वाहतूक वळवण्यात आली आहे. त्याच अरुंद रस्त्यावर हा अपघात झाला. दरम्यान या घटनेत किती लोक जखमी झाले, किती लोक भाजले याची माहिती मिळालेली नाही आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com