Suhas Kande
Suhas KandeTeam Lokshahi

Suhas Kande : खासदार संजय राऊत व अन्य कोणावरही आम्हा बंडखोर शिवसैनिकांचा राग नाही

बहुचर्चित शिवसेनेचे बंडखोर नांदगावचे आमदार सुहास कांदे (suhas kande) यांनी शिर्डीत येवून सपत्निक साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कांदे म्हणाले की, एकनाथ शिंदे (eknath shinde) राज्याचे मुख्यमंत्री होवे यासाठी साईबाबांना मी नवस केला होता. साईबाबांनी माझा नवस पूर्ण केला असुन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले असल्याने मी नवस फेडण्यासाठी सपत्नीक साईबाबांच्या दर्शनासाठी आलो होतो.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्य शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून मुक्त व्हावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis ) यांच्या माध्यमातुन राज्याचा विकास व्हावा असे साकडे साईबाबांकडे घातले.

यासोबतच ते म्हणाले की, मला मंत्रीपदाची जबाबदारी देवो न देवो पण ज्यांच्यावर मी खूप प्रेम केले त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. आता साईबाबा जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारेन असेही कांदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडी बाबत विचारले असता त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (sanjay raut) व कोणावरही आम्हा सर्व बंडखोर शिवसैनिकांचा राग, रुसवा नाही. मात्र प्रत्येकाला आपआपल्या मतदारसंघात विकास कामे करण्याचा खरा मुद्दा होता. त्यातूनच असा हा प्रकार घडला आहे.

नांदगाव विधानसभा मतदारसंघातही मतदारांकडून विकासाच्या अपेक्षा आहेत. असे सांगत त्यांनी परत मातोश्रीवर जाणार का ? या प्रश्नाला उत्तर देताना आमचे नेते एकनाथ शिंदे असून ते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Suhas Kande
Vasant More : “आजच सांगतो, किती पण ताकद लावा…”वसंत मोरेंचं थेट शिंदे सरकारला आव्हान
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com