Mantralayam
MantralayamTeam Lokshahi

Video : ...म्हणून त्याने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली, पोलिसांनी घेतलं ताब्यात

मंत्रालायत एका शेतकऱ्यांने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयात बांधलेल्या संरक्षण जाळीवर या शेतकऱ्यांनी उडी मारली आहे.

चेतन नरावरे : मुंबई | मंत्रालय परिसरात एका व्यक्तीने उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरूणाचं नाव बापू नारायण मोकाशी असल्याची माहिती समोर येत आहे.

Mantralayam
सावरकरांच्या विधानावर राहुल गांधी ठाम! म्हणाले, हिंमत असेल तर...

तो बीड जिल्ह्याच्या आष्टी येथील रहिवासी आहे. आत्महत्येच्या प्रयत्नात तरुणाच्या डोळ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या उपचाराकरिता त्याला जे जे रुग्णालय दाखल करण्यात आलं आहे.सदर व्यक्ती नोकरी मिळवण्यासाठी बऱ्याच काळापासून प्रयत्न करत होती. तसेच मुख्यमंत्री भेटत नसल्याने या तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला गेला. मात्र सुरक्षततेसाठी लावण्यात आलेल्या जाळीमुळे सदर तरुणाचा जीव वाचला. तरुणाने जाळीवर उडी मारल्यानंतर मंत्रालय परिसरातील विविध मजल्यांवरील कर्मचारी तसेच सामान्य नागरिक ते पाहण्यासाठी बाहेर आल्याचंही दिसून आलं. दरम्यान याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com