'काँग्रेस हीच भाजपची बी टीम' सुजात आंबेडकरांची टीका

'काँग्रेस हीच भाजपची बी टीम' सुजात आंबेडकरांची टीका

समनक जनता पार्टीचे उमेदवार प्राध्यापक अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ उकळीमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती.
Published by :
shweta walge

समनक जनता पार्टीचे उमेदवार प्राध्यापक अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ उकळीमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी काँग्रेस हीच भाजपची बी टीम असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

ते म्हणाले की, ज्या काँग्रेसने भंडाऱ्यात बाबासाहेबांना त्रास दिला त्याच काँग्रेसने अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना त्रास दिला आणि आता अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर यांना पाडण्यासाठी ही एकमेव बौद्ध उमेदवार उभा केला असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

या काँग्रेसने एकच बौद्धांचा आंबेडकरवादी उमेदवार दिला आणि तो अमरावतीमध्ये दिला आनंदराज आंबेडकर यांना पाडण्यासाठी ह्या काँग्रेसने बाबासाहेबांना भंडारामध्ये त्रास दिला ह्या काँग्रेसने भैया साहेबांना नांदेडमध्ये त्रास दिला ह्या काँग्रेसने बाळासाहेबांना अकोल्यामध्ये त्रास दिला आणि 2024 च्या निवडणुकीत हीच काँग्रेस आनंदराज आंबेडकर यांना अमरावती मध्ये त्रास देत आहे या परिस्थितीत आपण काँग्रेस सोबत जाऊ शकत नाही काँग्रेस हीच भाजपची खरी बी टीम आहे.

बाळासाहेब आंबेडकरांनी तीन ते चार वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला दोन पत्र लिहिली इंडिया आघाडीला आपण खुले पत्रही लिहिलं होतं जरा बी टीम असतो तर पत्र लिहिलं असतं का असा सवाल त्यांनी बोलताना उपस्थित केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com