महाविकास आघाडीची वज्रमुठ ढीली; खासदार सुजय विखे पाटील
Admin

महाविकास आघाडीची वज्रमुठ ढीली; खासदार सुजय विखे पाटील

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला

अभिराज उबाळे, पंढरपुर

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमुठ ढीली झाल्याची टीका करत, जयंत पाटील यांनी जे काल वक्तव्य केले आहे त्यावरून ते ही राष्ट्रवादी सोडून जातील असे वाटते.

खासदार सुजय विखे पाटील हे आज श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले.शरद पवार यांचा राजीनामा ही पक्षांतर्गत बाब आहे. जशी समुद्राची वाळू मुठीत घट्ट पकडल्या नंतर ती तितक्याच्या वेगाने ढीली होते. त्या प्रमाणे महाविकास आघाडी वज्र मुठ म्हणजे समुद्रातील वाळू घट्ट धरल्यानंतर जशी हातातून निसटते तसा प्रकार आहे.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिच निम्मा कार्यक्रम केला आहे. आता राहिलेला कार्यक्रम करतील असा टोला ही खासदार विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून लगावला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com