Summer Makeup Tips : उन्हाळ्यात मेकअप खराब होऊ नये, यासाठी जाणून घ्या 'या' सीक्रेट टिप्स
महिला कोणत्याही कार्यक्रमासाठी मेकअप करतात. मेकअपमुळे आपले सौंदर्य अधिक खूलून दिसते. मेकअप केल्याने चेहरा सुंदर दिसतो. तसेच मेकअपमध्ये अनेक प्रकार आहेत. त्यामधील न्यूडपासून ते मिनिमल आणि पेस्टलपर्यंत मेकअपचे प्रकार आहेत. सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे मेकअप करावा लागणार त्यातच उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे मेकअप करणे अधिक कठीण काम झाले आहे. कारण उन्हाळामध्ये जास्त प्रमाणात घाम येतो. ज्याने मेकअप खराब होऊन लूक खराब होऊ शकतो. परंतू तसे होऊ नये यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्याने तुमचा मेकअप खराब होणार नाही.
मॉइश्चरायझरचा वापर
मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. त्यामुळे चेहरा हायड्रेटेड राहतो. तसेच चेहऱ्यावर तेज येते.
सनस्क्रीन क्रीम
सनस्क्रीन क्रीमचे मुख्य फायदे म्हणजे त्वचेचे हानिकारक सूर्यकिरणांपासून संरक्षण करणे, त्वचेला होणारे नुकसान कमी करणे, आणि त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका कमी करते. सनस्क्रीन क्रीम लावल्याने त्वचा काळी पडत नाही. म्हणून मेकअपच्या आधी सनस्क्रीन लावावी. ज्यामुळे तुमचा मेकअप पसरणार नाही.
प्राइमरचा वापर
मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर प्राइमर लावा. ज्यामुळे त्वचा गुळगुळीत आणि मुलायम राहते. तसेच प्राइमर मेकअप सेट होण्यासाठी मदत करते. घाम आला तरीही मेकअप टिकतो. जर तुम्हाला खूप घाम येण्याची समस्या असेल तर तेलयुक्त प्राइमर वापरा.
ब्लॉटिंग पेपर
ब्लॉटिंगचा वापर चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषणून घेण्यास केला होतो. मेकअप केल्यानंतर घाम येतो. त्यावेळेस ब्लॉटिंग पेपरचा चेहऱ्यावर हलका दाब द्यावा. जेणेकरुन मेकअप खराब न करता घाम पुसला जाऊ शकतो आणि तुमचा मेकअप देखील टिकून राहण्यास मदत होते.
सेट्स स्प्रे
मेकअप फिक्सरमुळे तुमचा मेकअप अधिक काळ टिकून राहतो, विशेषतः उन्हाळ्यासारख्या हवामानासाठी हा मेकअप फिक्सर वापरला जातो. तसेच फिक्सरमुळे मेकअप नैसर्गिक दिसतो आणि तो जड किंवा बनावट वाटत नाही.
टिप- लेखात दिलेली सर्व माहिती ही सामान्य ज्ञानांवर अवलंबून आहे. याचा लोकशाही मराठीशी काही संबंध नाही.