Sunetra Pawar : बारामतीतला प्रत्येक माणूस  दादांसाठी कुटुंब

Sunetra Pawar : बारामतीतला प्रत्येक माणूस दादांसाठी कुटुंब

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार अशी लढत होणार असल्याची गेली अनेक दिवस चर्चा सुरु आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे.

यातच आता बारामतीमध्ये संवाद साधत असताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, तुम्ही आजपर्यंत आदरणीय दादांवरती प्रेम करत आलात आणि ही उर्जा त्यांना हे सगळं करण्याचे बळ देत आहे.

म्हणून मला आपल्याला एवढीच विनंती करायची आहे की, बारामतीतला प्रत्येक माणूस हा दादांसाठी कुटुंब आहे आणि म्हणूनच तुम्ही आजपर्यंत दिलेली साथ आहे हेच प्रेम आणि पाठिंबा कायम तुम्ही आम्हाला द्याल. असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com