Sunetra Pawar : 'तुमची साथ असेल तर लवकरच मोठं पाऊल उचलणार'

Sunetra Pawar : 'तुमची साथ असेल तर लवकरच मोठं पाऊल उचलणार'

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published on

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार अशी लढत होणार असल्याची गेली अनेक दिवस चर्चा सुरु आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता लोकसभेच्या उमेदवारीबाबत सुनेत्रा पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. सुनेत्रा पवार म्हणाल्या की, तुमची साथ असेल तर मी लवकरच एक मोठं पाऊल उचलणार आहे आणि तेही बारामतीकरांच्या भल्यासाठी उचलणार असून यासाठी बारामतीकरांनी एकत्र येऊन अजितदादांना साथ द्यावी. असं आवाहन केलं.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, पुढील काही दिवस आमच्यासाठी काम करा. पुढची सगळी वर्ष तुमचीच असतील. त्यामुळे अजितदादांना बळ देण्यासाठी सर्वांनी एकत्र लढायचं आणि जिकायचं आहे. आणि त्यामुळे दादांच्या पाठीशी आपण नेहमीच उभे राहता इथून पुढे देखील उभे राहावे. असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com