ताज्या बातम्या
Sanjay Raut यांचे बंधू Sunil Raut आमदारकीचा राजीनामा देणार? ट्विटमुळे चर्चांना उधाण
मी विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार, निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असं
संजय राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी ट्विट केलं आहे.
महाराष्ट्रातील निकाल हे अविश्वसनीय आहेत. मी स्वतः माझ्या मतदारसंघात किमान 40 ते 50 हजारांच्या मताधिक्याने जिंकायला हवाच होतो. पण मी 16 हजारांच्या मताधिक्याने जिंकलो. हा निकाल विक्रोळीतील हजारो मतदारांना सुद्धा मान्य नाही. मी विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे जर का निवडणुका बॅलेट पेपरवर होणार असतील. होऊन जाऊद्या दुध का दूध पानी का पानी अशी पोस्ट सुनील राऊतांनी केलीये.