भाजपामध्ये अन्याय होत असेल तर पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावं; ठाकरे गटाच्या आमदाराची पंकजा यांना ऑफर

भाजपामध्ये अन्याय होत असेल तर पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावं; ठाकरे गटाच्या आमदाराची पंकजा यांना ऑफर

पंकजा मुंडे यांच्या भाजपावर नाराज असलेल्या चर्चा काही नवीन नाही. याविषयावर राजकीय वर्तुळातून नेहमी काहीनाकाही प्रतिक्रिया येत असतात.

पंकजा मुंडे यांच्या भाजपावर नाराज असलेल्या चर्चा काही नवीन नाही. याविषयावर राजकीय वर्तुळातून नेहमी काहीनाकाही प्रतिक्रिया येत असतात. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी प्रतिक्रिया देत त्यांनी ऑफर दिली आहे.

आमदार सुनील शिंदे माध्यमांशी बोलतानान म्हणाले की, पंकजा मुंडे या राज्यातील महत्त्वाच्या नेत्या आहेत. त्यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होतोय. आपण सर्वच ते पाहत आहोत. अर्थात ही त्यांची पक्षांतर्गत बाब आहे. त्यावर आम्ही काही बोलणार नाही. त्यांच्या कर्तृत्वाची नेहमीच आम्हाला कदर असेल. पण त्यांच्यावर अन्याय होत असेल आणि त्यांना जर शिवसेनेत यायचं असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू, असे शिंदे म्हणाले. यावर आता पंकजा मुंडे कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

आमदार सुनील शिंदे हे पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या शाखेचंही उद्घाटन केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com