Sunil Tatkare : आढळराव पाटलांच्या पक्षप्रवेशापासून ते महायुतीच्या जागावाटपाबाबत तटकरेंनी दिली 'ही' माहिती

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर मधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या
Published by :
shweta walge

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर मधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या यावरच मात्र आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत बोलताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच आमदार अतुल बेनके आमदार चेतन तुपे दिलीप मोहिते पाटील आणि त्यांचा पक्षप्रवेश होत आहे. शिवाजीराव आढळराव पाटील आमच्यात बैठक झाली आढळराव पाटील यांचा 26 तारखेला संध्याकाळी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश हा शिरूर येथे होणार आहे.

तसेच, जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. परवा महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. आजच महायुतीच्या जागा वाटपावर एकमत होईल असं देखील ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com