Sunil Tatkare : अमित शाहांसोबत आज किंवा उद्या बैठक होणं अपेक्षित

Sunil Tatkare : अमित शाहांसोबत आज किंवा उद्या बैठक होणं अपेक्षित

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुनील तटकरे म्हणाले की, निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढणार. मला विश्वास आहे. निवडणुकीत 45 + असं उद्दिष्ट ठेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. विजय शिवतारेंना ज्यांना ज्या ठिकाणाहून लढायचं असेल त्याने लढावं.

फारशी कुणाची काय तमा बाळगण्याचे काही कारण नाही. शेवटी एक सभ्यता असते मर्यादा असते. 4 जागांच्या बाबतीमध्ये आम्हाला निर्णय करायचा आहे. त्यासंदर्भात या देशाचे नेते अमित शाहा यांच्यासोबत बैठक आहे.

कदाचित आज किंवा उद्या होणं अपेक्षित आहे कारण आज आचार संहिता जाहीर होईल. जागावाटपाची चर्चा समाधानकारक पद्धतीने सुरु आहे. असं सुनील तटकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com