छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.
Published on

छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. छगन भुजबळ यांनी सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली. छगन भुजबळ यांनी काल बारामतीमध्ये झालेल्या सभेत बोलताना नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आज ही भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनील तटकरे म्हणाले की, भुजबळ साहेब जेष्ठ नेते आहेत. परवानगीचा प्रश्न त्या ठिकाणी येतच नाही. प्रत्यक्षात त्यांची माझी भेट होईल तेव्हा मी या बाबातीमध्ये खुलासा करेन. भुजबळ नाराज असण्याचे कारण काय?

यासोबतच ते पुढे म्हणाले की, काल बारामतीच्या सभेमध्ये उत्स्फूर्तपणे त्याठिकाणी ते होते. ते जेष्ठ नेते आहेत. त्यांचे एक व्यक्तीमत्व आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक आपलं आगळंवेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. त्यांच्या भेटीमागणं प्रयोजन त्यांची माझी भेट झाल्यावर तुम्हाला मी सांगेनच. असे तटकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com