Video : समुद्रात उतरताच सुनीता विल्यम्स यांचे डॉल्फिन्सने केले असं स्वागत; व्हिडिओ व्हायरल
9 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या आहे. अवकाशातून पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विल्यम्स यांची पहिली झलक समोर आली आहे. अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचं अखेर पृथ्वीवर लँडिंग झालं.
सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर हे गेल्या 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवरवर पोहोचले होते. 8 दिवसांचाच त्यांचा हा प्रवास होता. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना 9 महिने थांबावे लागले. सुनीता विल्यम्स यांची पहिली झलक व्हिडीओच्या माध्यमातून नासाकडून शेअर करण्यात आली असून पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर परतल्या.
सुनीता विल्यम्स पृथ्वीवर आणणारे ड्रॅगन कॅप्सूल जे फ्लोरिडा येथील समुद्रात उतरल्यानंतरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावेळी ड्रॅगन कॅप्सूलला डॉल्फिन्सने वेढा घातल्याचे पाहायला मिळत आहे. हे डॉल्फिन्स तिथे आजूबाजूलाच फिरत होते जणू काही ते सुनीता विल्यम्स आणि सहकाऱ्यांचे स्वागतच करत आहेत. असे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता चांगलाच व्हायरल होत आहे.