Sunita Williams Updates : सुनीता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास लांबला

सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातून परतीचा प्रवास लांबला, मार्च 2025 पर्यंत परतण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. नासाच्या क्रू-9 मिशनमध्ये समावेश आहे.
Published by :
Team Lokshahi

सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर पुढच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत पृथ्वीवर येतील. पण स्टारलायनर स्पेसक्राफ्टमध्ये बिघाड झाल्याने ते तिथेच अडकून पडले. आता सुनीता आणि बुचच्या परतीची तारीख बदलली आहे. आता म्हटलं जातय की, मार्च 2025 पर्यंत दोघे पृथ्वीवर परत येतील. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोरला सुरक्षित पृथ्वीवर आणण्यासाठी नासाने त्यांचा क्रू-9 मिशनमध्ये समावेश केला आहे. सुनीता आणि बूचसह क्रू-9 चे चार अवकाशवीर ड्रॅगन स्पेसक्राफ्टने पृथ्वीवर परततील. या विलंबामुळे त्यांच्या मिशनचे नियोजन आणि तयारीत काही अडचणी आल्या आहेत, आणि अंतराळ विज्ञानाच्या बाबतीत आणखी काही अनिश्चितता निर्माण झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com