Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांची पृथ्वीवर एन्ट्री; 9 महिने अंतराळात काय-काय केलं?

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांची पृथ्वीवर एन्ट्री; 9 महिने अंतराळात काय-काय केलं?

9 महिन्यांनी अवकाशातून पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विल्यम्स यांची पहिली झलक समोर आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

9 महिन्यांनी अवकाशातून पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विल्यम्स यांची पहिली झलक समोर आली आहे. अखेर 9 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या आहे. अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचं अखेर पृथ्वीवर लँडिंग झालं.

सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर हे गेल्या 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवरवर पोहोचले होते. 8 दिवसांचाच त्यांचा हा प्रवास होता. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना 9 महिने थांबावे लागले. सुनीता विल्यम्स यांची पहिली झलक व्हिडीओच्या माध्यमातून नासाकडून शेअर करण्यात आली असून पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर परतल्या.

या 9 महिन्यांमध्ये सुनीता विल्यम्स यांनी जुनी उपकरणेही बदलली आणि काही वैज्ञानिक प्रयोगही केली. अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले. सुनीता विलियम्स आणि त्यांच्या टीमने 900 तास संशोधन केले. फुटबॉल मैदानाच्या आकाराच्या या अंतराळ स्थानकाची त्यांनी देखभाल आणि स्वच्छता केली. यासोबतच त्यांनी 150 हून अधिक प्रयोगही केले असून सुनीता विलियम्स यांनी स्पेस स्टेशनबाहेर तब्बल 62 तास 9 मिनिटे घालवली 9 वेळा स्पेसवॉक केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com