CM Devendra Fadnavis : 'गेल्या 45 वर्षांपासूनचा विदर्भाचा लढा यशस्वी'; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्री म्हणाले की...

सर्वोच्च नायलायच्या निर्णयावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त केले. नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
Published by :
Team Lokshahi

सर्वोच्च नायलायच्या निर्णयावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त केले. नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या 45 वर्षांपासून विदर्भाचा जो लढा चालू होता, त्याला आता दिलासा देण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाने केले आहे.

महाराष्ट्र राज्य ज्या वेळेला तयार झाले, तेव्हा त्या वेळेच्या रेव्हेन्यू रेकॉर्डस् मध्ये विदर्भातील जमिनी झुडपी जंगल असा केला. त्यामुळे 1980 ला आलेल्या कायद्यामुळे विदर्भातील जमिनींना जंगलाचा दर्जा दिला आणि विदर्भाचा विकास थांबला. नागपूर स्थानक, हायकोर्ट यांना झुडपी जंगलाचा दाखला दिला होता. विदर्भातील सिंचनाचे प्रकल्प, विकासाचे प्रकल्प अडले गेले होते. त्याचबरोबर विदर्भातील लोकांचा विकासही थांबला. झोपडपट्ट्यांना मालकी हक्क मिळाले नाहीत. मात्र हे मालकीहक्क त्यांना मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करून अहवाल सादर केला होता. त्या अहवालाला न्याय मिळवून देण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाने केले असल्याचे यावेळी मुखमंत्र्यांनी सांगितले. विकास आणि पर्यावरण यांचा साधर्म्य साधण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच यावेळी माओवाद्यांचा नेता प्रसव राजू यांचा आपल्या सुरक्षाज वानांनी खात्मा केला. त्यामुळे आता माओवाद शेवटच्या घटका मोजत आहे, त्याचाही लवकरच नाश होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com