बातम्या
Thackeray vs Shinde : सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. आज ठाकरे गटाकडून युक्तिवाद होणार आहे. आजपासून पुढचे सलग तीन दिवस खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. आज सुप्रीम कोर्टाकडून काय निर्णय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाने गेल्या सुनावणीत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आज शिंदे गट आपली बाजू मांडणार आहे.मागील सुनावणीच्या वेळी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता.