आरेतील झाडांचे भवितव्य आज ठरणार? पर्यावरण प्रेमींच्या याचिकेवर आज सुनावणी

आरेतील झाडांचे भवितव्य आज ठरणार? पर्यावरण प्रेमींच्या याचिकेवर आज सुनावणी

आरे प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आरे कारशेडचं सुरु झालेलं बांधकाम थांबवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलीय. पर्यावरणप्रेमींकडून विविध सात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर आज एकत्रितपणे सुनावणी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी होणार होती.
Published by :
Team Lokshahi
Published on

आरे प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आरे कारशेडचं सुरु झालेलं बांधकाम थांबवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलीय. पर्यावरणप्रेमींकडून विविध सात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर आज एकत्रितपणे सुनावणी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी होणार होती.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी गुरुवारी केंद्र सरकारला पत्रव्यवहार करून भावी सरन्यायाधीश म्हणून ज्येष्ठता क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यायमूर्ती लळित यांच्या नावाची शिफारस केली. त्यामुळे न्यायमूर्ती लळित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मेट्रो-३ प्रकल्पाची कारशेड कांजूरमार्ग येथून पुन्हा आरे वसाहतीत हलवण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. कामही सुरू झाले होते. मात्र आरेत पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले. याच पार्श्वभूमीवर आज सुनावणी आहे आणि या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरेतील झाडांचे भवितव्य आज ठरणार? पर्यावरण प्रेमींच्या याचिकेवर आज सुनावणी
मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी पूर्ण: मात्र न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com