Navneet Rana: नवनीत राणांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; जात प्रमाणपत्र वैध ठरवलं

Navneet Rana: नवनीत राणांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; जात प्रमाणपत्र वैध ठरवलं

आता या प्रकरणाचा निकाल लागला असून नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आले.
Published by :
Dhanshree Shintre

आज खासदार नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल लागणार होता. हायकोर्टाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र 2021 मध्ये अवैध ठरवलं होतं, त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

आता या प्रकरणाचा निकाल लागला असून नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आले असून निवडणूक लढवण्याचा नवनीत राणा यांचा मार्ग मोकळा झाला आहे. हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com