Supriya Sule : मोफत मेट्रोवर फडणवीसांची खिल्ली, सुप्रिया सुळेंचा सल्ला, 'आत्मचिंतन गरजेचं!'
Supriya Sule On Devendra Fandvis : राज्यात महापालिका निवडणुकाजवळ आल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांकडून आकर्षक घोषणा केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात मेट्रो प्रवास मोफत करण्याचं आश्वासन दिलं आणि चर्चेला उधाण आलं. या घोषणेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील मुलाखतीत चांगलाच टोला लगावला. घोषणा करणं सोपं असतं, पण त्या प्रत्यक्षात शक्य आहेत का, याचाही विचार हवा, असं त्यांनी सांगितलं. कुणीही हव्या त्या घोषणा करू शकतो, पण जनतेला पटतील अशाच गोष्टी बोलाव्यात, असं फडणवीस म्हणाले. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी त्या म्हणाल्या की, "ही लोकशाही आहे लोकशाहीत राहतात बस आणि मेट्रो सेवेचा जो शब्द आम्ही पुणेकरांना दिला आहेत तो 100% पाळण्यात येईल मेट्रो आणि बस यावरील तज्ञांकडून आम्ही सल्ला घेतलाय अभ्यास करून हा निर्णय घेतलाय पुणेकरांवर तुमचा आवाज अतिरिक्त बोजा पडणार नाही. लोकहिताच्या कामासाठी सरकार नाही मिळणार नाहीबोलायची जी ताकद आहे तशीच आमची ऐकायची ताकद आहे. मुख्यमंत्र्यांकडून माझी अपेक्षा होती त्यांनी महाराष्ट्रातली आणि पुण्यातली गुन्हेगारी थांबावी पुण्यातली गुन्हेगारी का थांबत नाहीये कोयता गॅंग का थांबत नाही पुण्यातला क्राईम आजचा नाही मात्र सरकार आल्यापासून ही गुन्हेगारी वाढली आहे हे भारत सरकारचा डेटा सांगतो हे डबल इंजिनच सरकार आहे केंद्रातला आणि राज्यातला त्यांचा सरकार आहे त्यांचाच डेटा सांगतो की पुण्यातली ही राज्यातली गुन्हेगारी वाढली आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन केले पाहिजे एक ऑल पार्टी मीटिंग बोलवून गुन्हेगारीवर चर्चा केली पाहिजे." असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.
थोडक्यात
पुण्यात क्राईम वाढला...
महाराष्ट्र सरकार आणि गृहमंत्रालयानं याचं आत्मपरीक्षण करावं...
खासदार सुप्रिया सुळेंचा सल्ला

