हा श्रेय वादाचा विषय नाही तर सामाजिक विषय;  बैलगाडा शर्यतीवर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

हा श्रेय वादाचा विषय नाही तर सामाजिक विषय; बैलगाडा शर्यतीवर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

मुंबई उच्च न्यायालयाने 2011 साली बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबई उच्च न्यायालयाने 2011 साली बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती. त्यानंतर 20 एप्रिल 2012 रोजी राज्य सरकारने परिपत्रक काढून राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. त्यावर कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याबाबत आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे.

सुप्रीम कोर्टाकडून बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र सरकारचा कायदा वैध आहे तसेच कायद्यात केलेले बदल हे समाधानकारक आहेत. त्यामुळे बैलगाडी शर्यतीवर बंदी नाही. असे सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले आहे

याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, खासदार अमोल कोल्हे यांचे आभार श्रेय्यवाद होत राहील पण सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय तो शेतकऱ्यांसाठी दिलाय या निर्णयाचे मी स्वागत करते अशी प्रतिक्रिया बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर मध्ये दिली आहे. श्रेय वादाचा विषय नाही हा सामाजिक विषय आहे अमोल कोल्हे यांनी यासाठी प्रचंड प्रयत्न केले आहेत यासाठी मी त्यांचा आभार मानते असं सुप्रिया सुळे म्हणाले आहेत.

हा श्रेय वादाचा विषय नाही तर सामाजिक विषय;  बैलगाडा शर्यतीवर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
बैल हा धावणारा प्राणी हे आम्ही सिद्ध केलं - देवेंद्र फडणवीस
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com