घरगुती गॅस सिलेंडरचे दर १०० रुपयांनी कमी; सुप्रिया सुळे म्हणाल्या...

घरगुती गॅस सिलेंडरचे दर १०० रुपयांनी कमी; सुप्रिया सुळे म्हणाल्या...

आज महिला दिन. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून महिलांना भेट देण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून महिलांना भेट देण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर १०० रुपयांनी कमी करण्यात आले आहे. ही माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विट करत दिली आहे.

महिला दिनाच्या निमित्ताने गॅस सिलेंडरचे दर शंभर रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईल. तसेच कोट्यवधी कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठी देखील उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य देखील सुधारेल.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, इलेक्शन आलं आहे. अनेक जुमले बघायला लागतील तुम्ही बघा. ही तर सुरुवात आहे. अभी पिक्चर बाकी है. त्याच्यामुळे इलेक्शनाची घोषणा होईपर्यंत काय काय करतील देवालाच ठाऊक. इतके दिवस आणि इतके वर्ष जेव्हा हजार रुपये होते आणि महिला रडत होत्या तेव्हा यांना सुचलं नाही. इलेक्शन आणि लोकसभा आली की लगेच 100 रुपये कमी. १०० रुपये कमी करून काय होणार ४०० रुपयाला द्या गॅस. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com