Supriya Sule
Supriya SuleTeam Lokshahi

राजकीय सुडापोटी ED आणि CBIचा गैरवापर हे दुर्दैव सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर निशाणा

राजकीय सुडापोटी ED आणि CBIचा गैरवापर हे दुर्दैव सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर निशाणा..

विकास कोकरे, बारामती

विरोधी पक्षावर कारवाई पुन्हा एकदा पक्षावर होते याचं मला आश्चर्य वाटत नाही, कारण अनिल देशमुख यांच्यावर ज्यावेळी रेड केली होती. त्यावेळी १०० कोटींचा आकडा हा एक कोटींवर आला होता,इडी आणि सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करून विक्रमच केला असल्याचे सुळें यांनी सांगितले.

केवळ राजकीय सुडापोटी विरोधकांवर कारवाई करणे हे देशासाठी दुर्दैव असल्याचे म्हणत राज्य सरकारवर सुळेंनी निशाणा साधला..राज्यात ९५ टक्के विरोधी पक्षातील लोकांवरून कारवाई झालेली आहे आणि अनेक लोक ज्याच्यावर अगोदर कारवाई झाल्या जे भारतीय जनता पक्षामध्ये गेले त्यावेळेस त्या कारवाई थांबल्या या सगळ्याचा डाटा देखील मी तुम्हाला देऊ शकते. केवळ राजकीय सुडापोटी किंवा बदला घेण्यासाठी ही कारवाई करणे आणि दुर्दैवी असल्याचे सुळेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com