महाराष्ट्राला गद्दारी आवडत नाही सुप्रिया सुळेंचा शिंदे - फडणवीस सरकारवर निशाणा

महाराष्ट्राला गद्दारी आवडत नाही सुप्रिया सुळेंचा शिंदे - फडणवीस सरकारवर निशाणा

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावरती आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

विकास कोकरे, बारामती

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावरती असून,बारामती शहरातील विविध ठिकाणची पाहणी करून गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला,महाराष्ट्रातील जनतेला गद्दारी आवडत नाही. असा खोचक टोला सुळे यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला. ज्या पद्धतीने महाराष्ट्राची वर्तमानपत्रांमध्ये व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बदनामी झाली. फक्त खोक्यांची चर्चा झाली यामुळे महाराष्ट्राचे राजकीय सामाजिक मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचा गंभीर आरोप सुळे यांनी राज्यसरकार वर केला. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये रोष व जी महाराष्ट्र सोबत गद्दारी झाली आहे ती जनतेला आवडली नाही. त्यामुळे आलेल्या सर्वेच मी मनापासून स्वागत करते. महागाईमुळे महाराष्ट्र भरला जात असल्यामुळे कदाचित हा सर्वे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आला असावा असा टोला देखील सुप्रिया सुळे यांनी सरकारला लगावला.

पुढे त्या म्हणाल्या की, ऑनर किलिंग हे चुकीच आहे त्यामुळे सातत्याने समाजामध्ये या प्रकरणाविषयी आम्ही लढतच आहे. एखाद्या मुलीवर हा अन्याय होणं अशा प्रकरणात आरोपींना अटक झाली याची समर्थनच करते. हा शाहू,फुले,छत्रपती व आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात या घटना घडत आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या लोकांनी या प्रश्नांमध्ये जातीने लक्ष घातलं पाहिजे. ज्या पद्धतीने सत्तेत असलेले काही लोक जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत याचेच लोन पसरत आहे. त्यामुळे अशा घटना पुरोगामी महाराष्ट्रात होऊ नये यासाठी सरकारने काम केले पाहिजे.

जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधी पाठीमागे शरद पवारांची शक्यता असेल यावर बोलताना सुळे म्हणाल्या की, काल जयंत पाटलाचं स्टेटमेंट आणि काल बोललेलं स्टेटमेंट हे जर सगळे व्यवस्थितपणे ऐकले तर हा प्रश्न उद्भवणार नाही आणि यावर मी बोलणं उचित राहणार नाही. असे त्या म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com