पुण्यात आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले; सुप्रिया सुळे म्हणाल्या...

पुण्यात आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले; सुप्रिया सुळे म्हणाल्या...

पुणे-नाशिक महामार्गावर कळंबजवळ भीषण अपघात झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुणे-नाशिक महामार्गावर कळंबजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातातआमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याच्या कारने दोघांना चिरडलं असल्याची माहिती मिळत आहे. पुणे नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यात कळंब गावच्या हद्दीत आमदार पुतण्याच्या गाडीने रात्री 11.40 वाजता दोघांना चिरडलं आहे.

पुतण्या मयूर मोहिते दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा ग्रामस्थांकडून आरोप करण्यात आला आहे. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हिट अँड रनच्या केसेस वाढत चालल्या आहेत. गृहमंत्र्यांना विनंती आहे. गेले वर्षभर नाराज होतात माझ्यावर सगळे भारतीय जनता पक्षाचे नेते. क्राईम वाढलेला आहे. मग ड्रग्ज असूदे, पोर्शची केस असूदे आणि आता ही असू दे. जे सत्तेमध्ये आहेत त्यांना एक न्याय आणि सर्वसामान्य माणसाला एक न्याय. या देशामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच हा देश चालणार आहे. कुणाची मनमान चालणार नाही. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुण्यात आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले; सुप्रिया सुळे म्हणाल्या...
पुणे-नाशिक महामार्गावर कळंबजवळ भीषण अपघात; आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याच्या कारने दोघांना चिरडलं
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com